Sunday, August 19, 2012

डोंगरांनी मला काय दिले ....

डोंगरांनी मला काय दिले ....

निसर्गात स्वच्छंदी भटकायचा आनंद, साहसाची अनुभूती, इतिहासाचे भान, काहीतरी जगावेगळे करयाचा आनंद हे सारे तर दिलेच पण त्यापेक्षादेखील एक अनोखा आनंद दिला तो म्हणजे पाच्छापुरातील वाचनालयाने ....

दिनांक २६ नोव्हेंबर २००५ 
भर दुपारची वेळ..  २५- ३० गावकरी आमची वाट पाहत आहेत..  
१०० - १५० विद्यार्थीदेखील होते...  
खरे तर आम्हाला उशीरच झाला होता...
आम्ही फार मोठे काही करत नव्हतो...
जे आम्हाला हे सुचले होते ते करण्याचा प्रयत्न होता तो.. 
पण त्यांच्या दृष्टीने खूप काही तरी होते.. 
आम्ही पोचणार होतो सकाळी १० वाजता. पण दिवा - सावंतवाडी रेल्वेला अपघात झाला आणि आमची वरात आमच्या एष्टीने १ वाजता पाच्छापुरात पोहचली ....
असे काय होते आमच्याकडे.. 
ज्यासाठी सारी मंडळी वाट पाहत होती.. 

आम्ही सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूरच्या शाळेत एक छोटेसे वाचनालय सुरु करणार होतो.. 
अमुक एवढी पुस्तके वैगरे काही अंदाज नव्हता. एक कल्पना सुचली होती आणि त्याच्या अनुषंगाने काम सुरु केले होते. क्षितिज ग्रुपच्या माध्यमातून सुधागडावर काम करताना जाणवले होते कि गावात देखील काहीतरी केले पाहिजे. इतिहास, गडावरील वास्तू हे सारे तर महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर पायथ्याच्या गावातील गिरीजन देखील तितकेच महत्वाचे आहेत. गावात दोन शाळा आहेत. एक प्राथमिक आणि एक माध्यमिक. माध्यमिक शाळा नुकतीच सुरु झालेली आणि विनाअनुदानित. आपण आजवर ढिगाने पुस्तके वाचली, इतिहासाची, निसर्गाची, ललित, विज्ञान, वैचारिक इ. आपली ऐपत होतीच पण त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे आपल्याला हाताशी अनेक वाचनालयेदेखील होती. मग असेच एक वाचनालय सुरु केले तर. पाली येथील महाविद्यालयातील उपप्राचार्य सुधीर पुराणिक यांच्याशी बोलता बोलता योजना नक्की झाली आणि पाहता पाहता वाचनालयाची संकल्पना अस्तिवात आली होती.  एक दोन आठवड्यात आम्ही सर्वांनी मिळून चार साडेचारशे पुस्तके जमा केली होती. प्रसाद निकतेच्या पुढाकाराने क्षितीज ग्रुपने सुधागडवर अनेक उपक्रम सुरु केलेच होते त्यात आता आणखीन एका नव्या उपक्रमाची भर पडणार होती. 

हे सारे आठवले ते परवाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी. १५ ऑगस्ट २०१२. 
तब्बल ७ वर्षे झाली होती त्या घटनेला. मध्यंतरी दोन तीन वेळा शाळेत गेलो होतो. वाचनालयाची यादी, नवीन पुस्तके वैगरे, पण नवीन काहीच  झाले नव्हते माझ्याकडून.  तसेही अनेक व्यवधाने मागे लावून घेतल्यामुळे याकडे पाहणे झालेच नव्हते. त्यामुळे ठरवून परवा गेलो. 

अगदी छोट्या स्वरुपात सुरु केलेल्या कामाचे आताचे स्वरूप पाहून खरेच मनापासून आनंद होत होता. 
पाच्छापुरातील अनेक गावकरी, माध्यमिक शाळेतील सारे विद्यार्थी एकत्र आले होते. आदल्या दिवशी क्षितीजच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. मुख्य म्हणजे वाचनालयासाठी भरपूर पुस्तके जमा झाली होती. (नक्की संख्या राहुल सांगू शकेल) महत्वाचे म्हणजे हे काम पुढे चालू राहिले होते. त्या दिवशी राहुल मेश्राम आणि नंदू देवधर सोडले क्षितीजचे इतर सारेचजण माझ्यासाठी नवे होते. ही ब्लॉग पोस्ट लिहण्याचे सर्वात महत्वाचे कारण हेच आहे.

संस्था का हवी?  २००५ साली आम्ही सर्वांनी मिळून हे वाचनालय क्षितीज ग्रुप आणि सेठ जे. एन. पालीवला कॉलेज एनएसएस युनिटच्या माध्यमातून सुरु केले. खरे तर गेल्या ३-४ वर्षात सुरवातीस पुढाकार घेणा-या कोणाचेच याकडे लक्ष नव्हते. तरीदेखील आज ७ वर्षानंतर त्यात अनेक नवीन पुस्तकांची भर पडत आहे. इतकेच नाही तर त्या अनुषंगाने अनेक उपक्रम सुरु आहेत. आज तर ९वी -१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके देखील दिली जात आहेत.  तब्बल १५० हून अधिक. शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांची संख्या तर १०००  च्या आसपास पोहचली आहे. हे सारे कसे झाले तर त्याच कारण म्हणजे संस्था. तुम्ही एखादा उपक्रम जेव्हा संस्थेसाठी करता तेव्हा ती संस्थेची जबाबदारी बनते आणि आपोआपच  संस्थेत येणारी पुढची पिढी तो पुढे नेते. नुसताच पुढे नेत नाही तर त्यात आपल्या परीने नाविन्यपूर्ण अशी भर घालते. संस्थेच्या कार्यास हातभार लावते. याचे पुरेपूर प्रत्यंतर मला परवाच्या दिवशी आले. सुरवातीच्या काळातील आम्ही कार्यकर्ते गेली काही वर्षे यात सक्रीय नसलो तरी संस्थेने आपला उपक्रम सोडला नाही. नेटाने प्रयत्न करत नवनवीन पुस्तके यात येत आहेत. इतकेच नाही तर संस्थेमार्फत अनेक स्पर्धादेखील घेतल्या जात आहेत. 

परवाच्या दिवशी त्या सर्व शाळेतील मुलांच्या चेह-यावरील आनंद खूप काही सांगून जात होता. सर्वाना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जात होते. इयत्तावार प्रमाणपत्र वाटत असताना काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. तेव्हा त्यांनी नंदूला विचारले. त्याने सांगितले कि पहिल्या तीन क्रमांकाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र शेवटी वाटणार. त्यावेळी त्या मुलांच्या चेह-यावरील आनंद वर्णन करण्यापलीकडचा होता. आपण बक्षीस फार काही मोठे देणार नव्हतो. पण त्यांना खूप आनंद झाला होता. मी तो सारा आंनद त्या मुलांमध्ये बसून अनुभवला. खूप बरे वाटले. एक छोटासा उपक्रम कसा वाढू शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण. मी क्षितीज ग्रुपचा सदस्य वैगरे म्हणून नाही सांगत पण संस्था म्हणून एखादा उपक्रम कसा पुढे न्यावा त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे गावातील लोकांचा सहभाग. गेली काही वर्षे दुर्गसंवर्धनाबद्दल बोलताना कायम या मुद्द्यावर भर देत आलोय. नेमका तोच मुद्दा साध्य करण्यासाठी वाचनालयाची सुरवात झाली होती. आज गावातील अनेक मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसत होती. त्यांना आपल्या संस्थेच्या कामाबद्दल कुतुहूल आणि कृतज्ञता होती. ग्रामस्थ बच्चू कडू सात वर्षापूर्वी वाचनालय सुरु करताना आपल्या बरोबर होता. आज आपले सर्व कार्यकर्ते त्याच्याच घरी उतरले होते. चहा घेताना शाळेतील एक शिक्षक आपण देत असलेल्या पुस्तकांबद्दल तसेच शालेय पुस्तकांबद्दल खूप आभार मानत होते. (त्यांचे मते शालेय सेटसाठी किमान ६५० रुपये खर्च करावे लागतात) . हा सारा सकारात्मक प्रतिसाद भविष्यात खूपच उपयोगी ठरणार आहे. ग्रामस्थांनी आपल्या कामाची नोंद घेतली होती. अर्थात याचा उपयोग भविष्यात नक्की होऊ शकेल..

सुधागडवरील संवर्धनाच्या व पाच्छापुरातील वाचनालयाच्या कार्यरत असणा-या सर्व कार्य कर्त्यांचे अभिनंदन व आभार 

..............................

जाता जाता वाचनालय सुरु करतानाच्या आठवणी:

२००५ साली जेव्हा असे वाचनालय सुरु कार्याचे ठरवले तेव्हा नेमकी कोणती आणि कशी पुस्तके घ्यावी याची माहिती नव्हती. तेव्हा अमेयने  National बुक ट्रस्टची माहिती काढली. तेथून  एक मोठा  बॉक्स भरून तब्बल दोनशे पुस्तके आणली. (अर्थात ती घेताना मी आणि अमेय नेहमीप्रमाणे भरपूर भांडलो). पुराणिक सरांबरोबर पुण्याला जाऊन अनमोल प्रकाशन आणि इतर दुकानातून पुस्तके गोळा केली. हि सारी पुस्तके कॉलेजच्या नावाने घेतली कारण त्यांना सवलत मिळत असे. पुराणिक सरांच्या भावाने देखील मदत केली होती.  त्याचबरोबर अनेक जणांनी यासाठी रोख तसेच पुस्तक स्वरुपात मदत केली.  सुरवातीस घेतलेल्या सर्व पुस्तकांची रजिस्टरमध्ये नोंद पाली कॉलेजच्या ग्रंथपालानी केली होती. पाच्छापुरातील माध्यमिक शाळेतील खंडागळे गुरुजीनी सर्व पुस्तके ठेवण्यासाठी कोठून तरी एक कपाट उपलब्ध केले होते. आज हे खंडागळे सर्व शिक्षा अभियानात पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत, त्यामुळे परवा भेट नाही झाली. वाचनालय सुरु करताना शाळेने आणि गावक-यांनी जंगी कार्यक्रम केला होता. चक्क मांडव वैगरे घातला होता शाळेपुढे. आमचे अगदी हार तुरे घालून स्वागत झाले होते. त्याच वेळी गावात एनएसएसचे शिबीर सुरु होते. ती मुले दुस-या दिवशी गडावर कामाला देखील आली होती. महादरवाजाचे बरेच काम तेव्हा झाले होते. विशेष म्हणजे तेव्हा अप्पा म्हणजेच धनंजय मदन देखील उपस्थित होते. 

(पुण्याहून पुस्तके घेऊन येताना खंडाळा घाटात मस्त चांदणे होते, पुराणिक सरांनी बाईकचा दिवा बंद केला आम्ही त्या नैसर्गिक प्रकाशात बराच घाट उतरलो.) 

डोंगरांनी मला काय दिले याची यादी करायची झाली तर हे वाचनालय हे सर्वोच्च ठिकाणी असेल. 

Wednesday, February 8, 2012

क्रिस्तोफ वैलिकी

क्रिस्तोफ वैलीकी,सर्व १४ एट थाऊंजडर(आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच) हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित दोन लेख/बातम्यांचा एकत्रित ब्लॉग. त्यावेळी 'लोकसत्ता'साठी लिहले होते, काही कारणास्तव प्रसिद्ध होऊ शकले नाही,आजच्या वातावरणात पुन्हा मांडावेसे वाटले.   

--------

गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या...                   

"ते सारे 'हाय अल्टिट्यूड टुरिस्ट' आहेत. गिर्यारोहक आणि गिरिपर्यटक यामधील फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. एव्हरेस्ट अथवा तत्सम वलय असलेले शिखर चढून जायचे एवढीच गिरिपर्यटकांची इच्छा असते. त्यापुढे जाऊन डोंगराची आस किती आहे आणि ते पुढे अन्य किती शिखरांवर आरोहण करतात हा मुद्दा महत्वाचा आहे." जगातील १४ च्या १४ एट थाउजंडर हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी सांगत होते. फेब्रुवारी २०११मध्ये दोन दिवसांच्या भारत भेटीवर ते मुंबईत त्यांच्याशी संवाद साधला. 

मोहिमेचा रूट आधीच तयार केलेला, रोप लावलेला आहे,साधनसामग्रीसाठी, पोर्टर मोठया प्रमाणात आहेत अशा परिस्थिती केलेले गिरिपर्यटन म्हणजे व्यापारी गिर्यारोहण मोहीम, तर याच्याबरोबर उलटी परिस्थिती गिर्यारोहकांच्या बाबतीत आढळते असे त्यांचे म्हणणे. अर्थातच क्रिस्तोफ यांचे स्वत:चे सारे गिर्यारोहण या दुसऱ्या पद्धतीनेच झालेले. सहा एटथाउजंडर हिमशिखरांचे आरोहण करताना तर डोंगरवर ते फक्त एकटेच होते. आजकालच्या व्यापारी तत्वावरील गिर्यारोहण मोहिमांविषयी बोलताना ते म्हणाले,'डोंगरावर आपण कोणा एकाची मालकी सांगू शकत नाही, पण व्यापारी मोहिमांनी काही तत्वे पाळावीत अशी ते अपेक्षा करतात. हे थांबवणे अवघड आहे. हे गिरिपर्यटक लिहतात तेदेखील फक्त स्वत:च्या बाबतीत, त्यामध्ये डोंगर खूप कमी असतो. त्यामुळे या गोष्टीना किती महत्व द्यायचे हा खरा प्रश्न आहे."

क्रिस्तोफ यांनी आजवर अनेक गिर्यारोहण मोहिमा केल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे सहा एटथाउजंडर हिमशिखरांवर त्यांनी फक्त एकट्यानेच आरोहण केले आहे.संपूर्ण डोंगरावर फक्त एकच माणूस. कोणी सोबतीला नाही, काही संदेश द्यायचा तर आजच्यासारखी प्रगत साधने देखील नाही, अशा मोहिमा केल्यावर अर्थातच आजचे व्यापारी वातावरण त्यांना खटकणे स्वाभाविकच. ते स्वत: कधीच त्या वाटेला गेले नाहीत. पण गिर्यारोहकाला पॅशन असणे महत्वाचे असल्याचे ते सांगतात. व्यापारी मोहिमात नेमकी या पॅशनचीच कमतरता असते, असे त्यांचे म्हणणे.आजकाल एखादे हिमशिखर चढून गेल्याचे जाहीर केल तर त्यावर पुरावे मागितले जातात. पण क्रिस्तोफ यांना आजवर कधीच कोणी कसलाही पुरावा मागितला नाही, कारण विश्वास. 

क्रिस्तोफ म्हणतात "तुमचा डोंगरावरच, तुमच्या स्वत:वरचा, आणि लोकांचा आपल्यावरचा. असे सर्व असेल तर मग कोणतीच गिर्यारोहण मोहीम कठीण नाही. किंबहुना हे सर्व होते म्हणूनच एकट्याने आठ हजारवर मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर आरोहण करता कधी भीती जाणवली नाही कधी कोणी त्यावर अविश्वास दाखवला नाही.

क्रिस्तोफ यांनी चक्क कडाक्याच्या हिवाळ्यातदेखील एव्हरेस्टवर आणि त्याहीपेक्षा अवघड अशा के टु हिमशिखरावर यशस्वी आरोहण केले आहे. असे करणारे ते पहिलेच गिर्यारोहक. पण असे धोकादायक धाडस करणे कितपत योग्य आहे यावर ते म्हणतात, "या सर्वासाठी तुम्हाला प्रचंड अनुभवाची गरज असते. भरपूर सराव आणि डोंगराशी मैत्री तुम्हाला हे बळ देवू शकते आणि त्यातूनच मग असे विश्वविक्रम होवू शकतात. नेमके आज याचा अभाव असल्याचे त्यांना जाणवते. अर्थातच आजकाल करिअरमुळे तरुणांना एवढा वेळदेणे शक्य नसल्याचेदेखील ते मान्य करतात. क्रिस्तोफ यांनी २०११ च्या हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमात गिर्यारोहण विषयक विशेष व्याखाने दिली होती. 

*************************************************************

क्रिस्तोफ वैलिकी – एक अवलिया

ब्रॉड पिक, लोधसे, धौलागिरी, शिशपग्मा, गशेरबर्म, नंगा पर्वत या सर्व आठ हजार मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर एक आरोहक केवळ एकट्यानेच जातो, दूरदूर लांबवर कोणीही नाही, अपघात झाला तरी, कोण, केव्हा उपचार करेल माहिती नाही, संदेश पाठवायची प्रगत साधने नाहीत. आहे काय तर फक्त एकच लक्ष्य, शिखर माथा गाठायचा. शिखरावर आरोहण केल्याचा आनंद व्यक्त करायचा तो निसर्गाबरोबरच. हे सगळे कोणत्याही चित्रपट शोभेल असे वर्णन आहे प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी यांच्या आजवरच्या थरारक गिर्यारोहण मोहिमांचे. नुसतेच एकट्याने आरोहण नाही तर एकदा बेस कॅम्प सोडला थेट शिखर असे सलग सोळा सतरा तास त्यांनी आरोहण केले आहे तेही पारंपारिक मार्ग न घेता.

हे नुसते एकट्याने आरोहण करणे कमी म्हणून की काय हा महाशयांनी आणखीनही काही उद्योग केले. भर हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे ४५ असते, १००-१५० मीटर ताशी वेगाने वारे वाहत असतात, दिवसादेखील बर्फावरून चालणे त्रासदायक असते अशा वेळी चक्क एव्हरेस्टवरच स्वारी केली. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच आरोहण होते. इतकेच नाही तर पुन्हा कानचेनजुंगा आणि लोधसे पण हिवाळ्यात सर केले. 

असे हे जगावेगळे व्यक्तिमत्व हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने (२०११) भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबईतील गिर्यारोह्कांसमोर आपले अनुभवकथन तर केलेच पण थोडे उपदेशाचे डोसदेखील पाजले.

क्रिस्तोफ यांचे हे सर्व उद्योग पहिले तर वाटते की, या माणसाचा जन्म डोंगरासाठीच झाला आहे. त्यांच्या हाडामासात गिरीप्रेम भिनले आहे. एकट्याने शिखर आरोहण केल्यावर आनंद कुठे व्यक्त करायचा हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही की, आपण या शिखरावर होतो याचा काही पुरावा गोळा करावा अशी देखील कधी गरज भासली नाही. आनंद व्यक्त करत बसण्यापेक्षा आरोहणावर जास्तीत जास्त लक्ष कसे केंद्रित करता येईल, यावर सगळा भर. आनंद साजरा करायचा तर घरी गेल्यावर  किंवा बेस कॅम्पला करू, कारण डोंगर उतरताना सर्वात जास्त अपघात झाले आहेत, त्यामुळे ती काळजी आधी. 

पुराव्याचे म्हणाल त्यांनी फक्त नंगा पर्वतवर फोटो काढले आणि तेथे पूर्वी कोणीतरी ठेवलेला एक स्कार्फ आणि पिटॉन बरोबर घेतला. याच नंगा पर्वतावर जाताना बेस कॅम्पलादेखील कोणी नव्हते. शिखरावरील त्यांची सारी हालचाल खालचे गावकरी मोठ्या दुर्बिणीतून न्याहाळत होते, पण क्रिस्तोफना याची कल्पनाच नव्हती. थोडक्यात सारे काही डोंगरासाठीच असेच त्यांचे जीवन आहे.

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाल्यावर १३ वर्षाची नोकरी चक्क सोडून दिली. महिन्यातून ३ -४ महिने काम करायचे आणि मग बाकी सर्व काळ डोंगरात असे याचे आयुष्य. बर नोक-या तरी कोणत्या केल्या. एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या साहेबाला गाठून मोहिमेसाठी मदत मागायची त्यासाठी त्याच्या उंच उंच इमारतीवर नाव टाकणे, मोठ्या चिमण्यावर नाव टाकणे अशी काही कामे करायची. तो साहेब पण मोहिमेला मदत म्हणून अशी काम उदारपणे द्यायचा. फिशिंग वैगरे अन्य काही अर्थार्जनाचे उद्योग धंदे पण केले. पण सगळा भर तो उंचावर जाण्याचा. क्रीतोफनी आजवर ३० एक मोठ्या मोहिमा केल्या आहेत, छोट्या छोट्या मोहिमांची तर गणतीच नाही.  कधी कधी सोलो क्लाईम्बिंग व हिवाळ्यातील आरोहणावर गिर्यारोहण क्षेत्रातून आक्षेप यायचे. पण क्रिस्तोफ म्हणतात, तुमचा अनुभव महत्वाचा त्या जोरावर तुम्ही विश्वास कमवता. स्वत:वर आणि जगावर. डोंगर तर तुमचा सखासोबती असतोच. अतिशहाणणा नसेल तर हे सर्व तुम्ही आरामात करू शकता. 

व्यापारी मोहिमांबाबत देखील त्यांचे मत महत्वाचे आहे. त्या थांबवणे अवघड आहे पण त्यातून गिरीपर्यटक तयार होतात आणि दुसरीकडे गिर्यारोहक घडतो. जो स्वत:च्या आयुष्यातदेखील खूप धैर्याने समोर जातो. स्वत: क्रिस्तोफ तर कधीच डगमगले नाहीत मग ते डोंगर असो कि कुटुंबातील अडचणी. स्वत:च विटा रचून स्वत:च घर बांधले. अनेक अपघात, सहका-यांचे मृत्यु डोळ्यादेखत झाले. मोठ्या अपघातानंतर देखील लोधसे शिखरावर यशस्वी आरोहण केले.  हे सर्व त्यांना डोंगराची सोबत होती म्हणूनच.  आज ६१ व्या वर्षी देखील न चुकता दरवर्षी हिमालयात जात असतात. पोलंडमध्ये स्वत:ची केटू  स्पोर्ट नावाची संस्था आहे. हाडाचा गिर्यारोहक कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे.

---समाप्त---

Tuesday, February 7, 2012

गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या - क्रिस्तोफ वैलीकी

क्रिस्तोफ वैलीकी,सर्व १४ एट थाऊंजडर(आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच) हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित दोन लेख/बातम्यांचा एकत्रित ब्लॉग. त्यावेळी 'लोकसत्ता'साठी लिहले होते, काही कारणास्तव प्रसिद्ध होऊ शकले नाही,आजच्या वातावरणात पुन्हा मांडावेसे वाटले.   

--------

गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या - क्रिस्तोफ वैलीकी                   

"ते सारे 'हाय अल्टिट्यूड टुरिस्ट' आहेत. गिर्यारोहक आणि गिरिपर्यटक यामधील फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. एव्हरेस्ट अथवा तत्सम वलय असलेले शिखर चढून जायचे एवढीच गिरिपर्यटकांची इच्छा असते. त्यापुढे जाऊन डोंगराची आस किती आहे आणि ते पुढे अन्य किती शिखरांवर आरोहण करतात हा मुद्दा महत्वाचा आहे." जगातील सर्व १४ एट थाउजंडर हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी सांगत होते. फेब्रुवारी २०११ मध्ये दोन दिवसांच्या भारत भेटीवर ते मुंबईत त्यांच्याशी संवाद साधला. 

मोहिमेचा रूट आधीच तयार केलेला, रोप लावलेला आहे,साधनसामग्रीसाठी पोर्टर मोठया प्रमाणात आहेत अशा परिस्थिती केलेली व्यापारी गिर्यारोहण मोहीम म्हणजे गिरिपर्यटन, तर याच्याबरोबर उलटी परिस्थिती गिर्यारोहकांच्या बाबतीत आढळते असे त्यांचे म्हणणे. अर्थातच क्रिस्तोफ यांचे स्वत:चे सारे गिर्यारोहण या दुसऱ्या पद्धतीनेच झालेले. सहा एटथाउजंडर हिमशिखरांचे आरोहण करताना तर डोंगरवर ते फक्त एकटेच होते. आजकालच्या व्यापारी तत्वावरील गिर्यारोहण मोहिमांविषयी बोलताना ते म्हणाले,'डोंगरावर आपण कोणा एकाची मालकी सांगू शकत नाही, पण व्यापारी मोहिमांनी काही तत्वे पाळावीत अशी ते अपेक्षा करतात. हे गिरिपर्यटक लिहतात तेदेखील फक्त स्वत:च्या बाबतीत, त्यामध्ये डोंगर खूप कमी असतो. हे थांबवणे अवघड आहे, त्यामुळे या गोष्टीना किती महत्व द्यायचे हा खरा प्रश्न आहे."

क्रिस्तोफ यांनी आजवर अनेक गिर्यारोहण मोहिमा केल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे सहा एटथाउजंडर हिमशिखरांवर त्यांनी फक्त एकट्यानेच आरोहण केले आहे.संपूर्ण डोंगरावर फक्त एकच माणूस. कोणी सोबतीला नाही, काही संदेश द्यायचा तर आजच्यासारखी प्रगत साधने देखील नाही, अशा मोहिमा केल्यावर अर्थातच आजचे व्यापारी वातावरण त्यांना खटकणे स्वाभाविकच. ते स्वत: कधीच त्या वाटेला गेले नाहीत. पण गिर्यारोहकाला पॅशन असणे महत्वाचे असल्याचे ते सांगतात. व्यापारी मोहिमात नेमकी या पॅशनचीच कमतरता असते, असे त्यांचे म्हणणे.आजकाल एखादे हिमशिखर चढून गेल्याचे जाहीर केल तर त्यावर पुरावे मागितले जातात. पण क्रिस्तोफ यांना आजवर कधीच कोणी कसलाही पुरावा मागितला नाही, कारण विश्वास. 

क्रिस्तोफ म्हणतात "तुमचा डोंगरावरच, तुमच्या स्वत:वरचा, आणि लोकांचा आपल्यावरचा. असा विश्वास असेल तर मग कोणतीच गिर्यारोहण मोहीम कठीण नाही. किंबहुना हे सर्व होते म्हणूनच एकट्याने आठ हजारवर मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर आरोहण करता कधी भीती जाणवली नाही कधी कोणी त्यावर अविश्वास दाखवला नाही.

क्रिस्तोफ यांनी चक्क कडाक्याच्या हिवाळ्यातदेखील एव्हरेस्टवर आणि त्याहीपेक्षा अवघड अशा केटु हिमशिखरावर यशस्वी आरोहण केले आहे. असे धोकादायक धाडस करणे कितपत योग्य आहे यावर ते म्हणतात, "या सर्वासाठी तुम्हाला प्रचंड अनुभवाची गरज असते. भरपूर सराव आणि डोंगराशी मैत्री तुम्हाला हे बळ देवू शकते आणि त्यातूनच मग असे विश्वविक्रम होवू शकतात. नेमके आज याचा अभाव असल्याचे त्यांना जाणवते. अर्थातच आजकाल करिअरमुळे तरुणांना एवढा वेळ देणे शक्य नसल्याचेदेखील ते मान्य करतात. 

क्रिस्तोफ यांनी २०११ च्या हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमात गिर्यारोहण विषयक विशेष व्याखान दिले होते. 

*************************************************************

क्रिस्तोफ वैलिकी – एक अवलिया

ब्रॉड पिक, लोधसे, धौलागिरी, शिशपग्मा, गशेरबर्म, नंगा पर्वत या सर्व आठ हजार मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर एक आरोहक केवळ एकट्यानेच जातो, दूरदूर लांबवर कोणीही नाही, अपघात झाला तरी, कोण, केव्हा उपचार करेल माहिती नाही, संदेश पाठवायची प्रगत साधने नाहीत. आहे काय तर फक्त एकच लक्ष्य, शिखर माथा गाठायचा. शिखरावर आरोहण केल्याचा आनंद व्यक्त करायचा तो निसर्गाबरोबरच. हे सगळे कोणत्याही चित्रपट शोभेल असे वर्णन आहे प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी यांच्या आजवरच्या थरारक गिर्यारोहण मोहिमांचे. नुसतेच एकट्याने आरोहण नाही तर एकदा बेस कॅम्प सोडला थेट शिखर असे सलग सोळा सतरा तास त्यांनी आरोहण केले आहे तेही पारंपारिक मार्ग न घेता.

हे नुसते एकट्याने आरोहण करणे कमी म्हणून की काय हा महाशयांनी आणखीनही काही उद्योग केले. भर हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे ४५ असते, १००-१५० मीटर ताशी वेगाने वारे वाहत असतात, दिवसादेखील बर्फावरून चालणे त्रासदायक असते अशा वेळी चक्क एव्हरेस्टवरच स्वारी केली. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच आरोहण. इतकेच नाही तर पुन्हा कानचेनजुंगा आणि लोत्हसे पण हिवाळ्यात सर केले. 